ramzan mubarak 2020

Ramadan Mubarak : पवित्र रमजान महिन्याची आजपासून सुरुवात, घरातच नमाज पठण करण्याचे आवाहन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजानच्या कालावधीत खबरदारी बाळगण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. रमजानमध्ये दैनंदिन प्रार्थना, इफ्तार तसेच तरावीहसाठी मुस्लिम बांधव एकत्रित येत असतात. मात्र कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मुस्लिम बांधवांनी एकत्रित न येता घरीच रमजान साजरा करावा अशी सूचना प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे.


रमजान  मुस्लिम समाजाचा पवित्र महिना आज पासून सुरू होत आहे , मात्र ह्या वर्षी कोरोंनाचे सावट आहे. 
 तेव्हा मुस्लिम बांधवांनी हा पवित्र महिना घरी बसून साजरा करावा असं आवाहन मुस्लिम अभ्यासक नौशाद उस्मान यांनी केले आहे. यासाठी कुराण शरीफातील दाखला ही त्यांनी दिला. त्यात तुम्ही एका जीवाच्या मृत्यूस ही कारणीभूत ठरला तर तुम्ही मानवतेचा जीव घेतल्याचं पाप तुमच्या माथी लागेल, असं अल्लाहने नमूद केल्याचं ते सांगतात.कोरोनाच्या महामारीच्या पाश्वभूमीवर कोरोना घरीच साजरा करा असा आव्हान करण्यात येत आहे 



गर्दी न करता घरातच नमाज पठण करा
रमजानच्या ह्या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधवांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घरातच नमाज पठण करावं व  रमजानचा उपवास सोडण्यासाठी विविध फळं,अन्न पदार्थ खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी करू नये सरकारचे आदेश पाळावे अस आव्हान धुळ्यातील मुस्लिम धर्माचे धर्मगुरु मुफ्ती कासीम जिलानी यांनी मुस्लिम बांधवांना केलं आहे.



रमजान मध्ये खबरदारी म्हणून प्रशासनाच्या वतीने काही सूचना करण्यात आल्या आहे जसे की रमजानमध्ये दैनंदिन प्रार्थना, इफ्तार तसेच तरावीहसाठी मुस्लिम बांधव एकत्रित येत असतात. मात्र कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मुस्लिम बांधवांनी एकत्रित न येता घरीच रमजान साजरा करावा अशी प्रशासनाने सूचना केल्या आहेत