maha vitran


मुंबई, 13 एप्रिल : Coronavirus च्या प्रादुर्भावामुळे lockdown च्या परिस्थितीत वीजबिलासंदर्भात मोठा निर्णय उर्जा मंत्र्यांनी घेतला आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याचं वीजबिल भरण्यास मुदतवाढ देण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. ज्या वीजग्राहकांकडे मीटर रीडिंगची सोय आहे. त्यांनी स्वतःच मीटर रीडिंग पाठवण्याचं आवाहनही उर्जामंत्र्यांनी केलं आहे.

मुबईत बाधितांचा आकडा गेला 1549 वर , आणि कोरोनाबळी संख्या 1000 च्या वर 


महावितरणच्या व्यापारी , व्यावसायिक आणि इतर सर्वच वीज ग्रहाकांना मार्च आणि एप्रिल महिन्याचं वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचे आदेश राऊत यांनी महावितरणला दिले आहेत.



सोबतच महावितरणच्या सर्व वीजग्राहकांनी त्यांच्या वीज मीटरचे स्वतः रिडींग घेऊन महावितरणच्या वेबसाईट किंवा मोबाईल ॲपद्वारे अपलोड करावेत, असं आवाहन त्यांनी केलं आहे. यामुळे वीजग्राहकांना अचूक मीटर रिडींगचं वीजबिल प्राप्त होईल. ज्या ग्राहकांकडे रिडींग उपलब्ध नसेल अशा घरगुतीसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सरासरी विजबिल पाठवण्यात येईल. त्यांचं बिल हे मागच्या काही महिन्याच्या सरासरीनुसार आकारण्यात येईल.