Irrfan Khan |इरफान खान आयसीयूत अचानक तब्येत बिघडल्यामुळे अॅडमिट , मृत्यूच्या अफवांबाबत परिवाराचं स्पष्टीकरण|irrfan khan admitted icu in mumbai

About Me

Irrfan Khan |इरफान खान आयसीयूत अचानक तब्येत बिघडल्यामुळे अॅडमिट , मृत्यूच्या अफवांबाबत परिवाराचं स्पष्टीकरण|irrfan khan admitted icu in mumbai


irrfan khan admitted icu in mumbai claims his team

irrfan khan admitted icu in mumbai claims his team

मुंबई : इरफान खान बॉलिवूड अभिनेता काही काळापासून न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर नावाच्या आजाराशी झुंज देत आहे , इरफान खान याची प्रकृती अचानक बिघडली असून त्याला हॉस्पीटलमध्ये आयसीयूत भर्ती करण्यात आले आहे.


maharashtra news ntnewes24

 इरफान खानला मुंबईतील  कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले  मात्र इरफानच्या मृत्यूसंदर्भात पसरलेल्या अफवांमुळे त्याच्या परिवाराला त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या उलटसुलट अफवांमुळं त्याचा परिवार नाराज आहे. यासंदर्भात त्यांनी एक प्रसिध्दीपत्रक जारी केले आहे.



या पत्रकात म्हटलं आहे की, इरफानबाबत अशा प्रकारच्या अफवा अत्यंत असंवेदनशील आहेत. त्यांच्या तब्येतीबाबत अंदाज लावणं चूक आहे. आम्ही इरफानवर भरभरुन प्रेम करणाऱ्या आणि त्याच्या प्रकृतीची चिंता करणाऱ्या लोकांप्रती आभारी आहोत. मात्र त्याच्या प्रकृतीविषयी पसरवल्या जाणाऱ्या अफवा त्रासदायक आहेत. इरफान एक खंबीर व्यक्तीमत्व आहे आणि तो या आजाराचा सामना करत आहे, असं इरफानच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.त्यांनी म्हटलं आहे की, आम्ही आपल्याला विनंती करतो की, अशा अफवा पसरवू नका. आम्ही आपल्याला इरफानच्या तब्येतीबाबत अपडेट देत राहू.