pune corona virus updates

मुंबई : राज्यात मंगळवारी 729 कोरोंनाबाधित रुग्णांची नोंद झाली त्या मुळे राज्यात एकूण संख्या 9318 झाली आहे , राज्यात मंगळवारी एकूण 31 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे 25, जळगाव येथील 4 तर पुणे शहरातील 2 आहेत. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता एकूण 400 झाली आहे. त्यात आनंदाची बाब म्हणजे आज 106 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.



आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार पाठविण्यात आलेल्या  1,29,931 नमुन्यांपैकी 1,20,136 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 9318 जण पॉझिटिव्ह आले आहेत.एकट्या मुंबईत एकूण रूग्ण संख्या 6169 वर पोहोचली आहे. तर आतापर्यत 244 रुग्ण दगावली आहेत.  

हेही वाचा : 

Breaking News 2 साधूंची गळा दाबून हत्या शिवमंदिर परिसर हादरला!



आशियातील सर्वात मोठी  झोपडपट्टी धारावीत  कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या 330 झाली आहे तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे. धारावीत मंगळवारी 42 रुग्ण सापडले आहे. हे रुग्ण एकाच भागातील नसून विविध भागातील आहेत. त्यामुळे धारावीत कम्युनिटी संसर्ग पसरत चालला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पालिकेकडून येथील रुग्णसंख्या वाढू नये यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे हा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. सध्या धारावीतील अनेक भागांमध्ये हॉटस्पॉट उभारले आहेत. कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी ठिकठिकाणी अशा स्वरुपाच्या हॉटस्पॉटची आवश्यक व्यक्त केली जात आहे.

पुण्यात 24 तासात तब्बल 122 रुग्णांची वाढ झाली आहे , ही पुण्यातीला आज पर्यन्त सर्वाधिक वाढ आहे त्यामुळे एकट्या पुण्यात रुग्णांची संख्या 1339 झाली आहे व जिल्ह्यात  करोना रुग्णांची संख्या 1491 झाली आहे