कोरोनाचा वाढता फैलाव पहाता लॉडाउन 30 एप्रिल पर्यन्त वाढवावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना व्हायरसचा देशात वेगानं वाढत असलेला संसर्ग रोखण्यासाठी आज पुन्हा मोठी घोषणा कऱण्याची शक्यता आहे. 14 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले होते. मात्र राज्यातील स्थितीवरही प्रत्येक राज्य पंतप्रधानांसोबत चर्चा करून निर्णय घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण लॉकडाऊन वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तयार असल्याचं सांगण्यात येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत  व्हिडिओ कॉन्फ्रेसिंगमध्ये सीएम उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव आणि डीजीही उपस्थित आहेत. यामध्ये मुंबई - एमएमआर जीरण, पुणे आणि काही बाधित भागासाठी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढविण्याची विनंती केली आहे.




सध्या पंजाब आणि ओडिसा या राज्यांनी 1 मे पर्यन्त लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आणि लॉकडाऊनसंदर्भात बोलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत सकाळी 11 वाजल्यापासून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा सुरू आहे.