anil deshmukh home minister

पालघरमध्ये चोर असल्याचं समजून जमावाकडून दोन साधूंसह तिघांची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती.आज या घटनेसंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे संवाद साधला.
पालघर हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे त आला आहे.सोपवण्या आला आहे ही घटना झाल्यानंतर आठ तासात 101 जणांना ताब्यात घेतलं आहे. मात्र ह्या घटनेला जातीय रंग देण्यात येत आहे व ही बाब दुर्दैवी असल्याच राज्याचे गृमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे 



 देशमुख यांनी आज फेसबुक लाईव्ह द्वारे संवाद साधला. ते म्हणाले की, घटनेनंतर गुन्हेगार बाजूच्या जंगलात पळून गेले होते. तिथून त्यांना ताब्यात घेतलं. त्या 101 जणांची यादी आज जाहीर करणार आहे अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.



यावेळी देशमुख यांनी सांगितलं की, पालघरच्या घटनेत एकही मुस्लीम नव्हता. ही घटना घडत असताना काही जण 'ओये बस', 'ओये बस' असं म्हणत होते. त्या ऐवजी शोएब असं बोललं जात असल्याचा गैरसमज पसरवण्यात आला. या घटनेला जातीय रंग देण्यात आला. ही दुर्दैवी गोष्ट आहे. आज संपूर्ण यंत्रणा कोरोनाशी लढत असताना त्यात जातीचं राजकारण आणण्याचा प्रयत्न केला गेला. आज ती वेळ नाही. एकत्र येऊन काम करण्याची वेळ आहे, असं ते म्हणाले.


पालघर हत्याकांड आरोपींचे नावे 

palghar hatyakand aropinche nave jahir



facebook live gruh mantri
corona upadtes