Coronavirus: Oxford vaccine effective in monkeys, heading for mass production in India

कोलकत्ता , 29 एप्रिल : जगभरात कोरोनाने थैमान घालणार्‍या कोरोनावर लस शोधता आलेली नाही आहे. अनेक देश यावर लस शोधत आहे . असेच एक संशोधन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या टीमने केलं आहे. कोरोना लस बनविण्याच्या प्रयत्नात असलेल्या वैज्ञानिकांच्या पथकात एका भारतीयचादेखील समावेश आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील एक महिला ऑक्सफर्डकडून ही लस तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे..



maharashtra news


ऑक्सफर्डमध्ये राहणाराऱ्या 34 वर्षीय चंद्र दत्ता युनिव्हर्सिटी फॅसिलिटी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये अॅंटी व्हायरल वेक्टर वॅक्सीन ChAdOx1 nCoV-19 तयार करण्यासाठी गुणवत्ता व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. 



चंद्राचे 65 वर्षीय वडील समीर कांती आणि 58 वर्षीय आई काबेरी दत्ता कोलकातामधील गोल्फ गार्डन परिसरात राहतात. त्यांनी आमच्या एकुलत्या एका मुलीवर गर्व असल्याचे सांगितले. कोरोनावर लस मिळवण्यासाठी गेले काही दिवस रात्रंदिवस चंद्रा काम करत आहे. मात्र आई-वडिलांना चिंताही आहे. चंद्राची आई काबेरी म्हणाल्या, "माझी मुलगी नेहमीच महत्वाकांक्षी आणि बुद्धिमान होती. कोरोनोव्हायरस ज्या प्रकारे पसरत आहे त्याबद्दल मला खूप काळजी वाटते". ब्रिटनमध्ये कोरोना संक्रमित प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत.