chini virus corona wuhan city china


वॉशिंग्टन : सध्या कोरोनाव्हायरसणे संपूर्ण जगाला हैराण करून सोडला आहे , व यात दोन बलाढ्य देश अमेरिका आणि चीन आमने सामने आले आहेत , अमिरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, चीन कोरोनाला रोखू शकला असता, "आम्ही सध्या या सगळ्याची तपासणी करत आहोत योग्य वेळ आल्यानंतर याबाबत माहिती देण्यात येईल". मुख्य म्हणजे ज्या वुहानमधून कोरोनाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली आहे, ते शहर आता कोरोनामुक्त झाले आहे.






ट्रम्प यांनी चीनवर बोलताना संगितले की आम्ही चीनची खूप गंभीर तपासणी करत आहोत . डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे असेही म्हटले की, "आम्ही सध्याच्या परिस्थितीवर खुश नाही आहोत. कारण आम्हाला वाटतं की कोरोनाला थांबवणं शक्य होतं. आज संपूर्ण जग यातना भोगत आहे. किमान 184 देश कोरोनासाठी असुरक्षित आहेत". विशेष म्हणजे चीनमधून उद्भवणार्‍या कोरोना विषाणूच्या साथीसंदर्भात दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये बरीच आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.



हा विषाणू चीनच्या लॅबमधून सोडला गेला आहे की नाही याबद्दल अमेरिकाने शंका निर्माण केली आहे 
 अध्यक्ष ट्रम्प यांनी अनेकदा याला 'चिनी व्हायरस' म्हटले आहे. चीनमधील वुहानमध्ये पसरलेल्या या विषाणूमुळे अमेरिकेत सर्वाधिक विनाश झाला आहे. अमेरिकेत 9 लाख 87 हजार 467 लोक संक्रमित झाले आहेत आणि 56 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.