nashik lockdow2n


कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी 3 मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला असला तरी प्रत्येक राज्यात आणि जिल्ह्यात स्थितीचा आढावा घेत काही नियम शिथिल करण्यात येतील अस आदेश पंतप्रधान मोदींनी 14 एप्रिलला आदेश दिले होते

त्यानुसार 20 एप्रिल पासून कोरोनामुक्त झालेल्या राज्य व कोरोनाचा धोका कमी असलेले राज्य  अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त काही सेवा सुरू करण्यात येणार आहेत.
 गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये शेती आणि ग्रामीण भागांतील विशिष्ट उद्योगांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. जेथे गर्दी जमते असे व्यवसाय सुरू होणार नाही .

मोबाईलवर न्यूज अपडेटसाथी  येथे क्लिक करून आमचा टेलिग्राम चॅनल जॉइन करा 

तर, हवाई सेवा, रेल्वे सेवा, टॅक्सी, मेट्रो, शाळा, मॉल्स, जलतरण तलाव, जीम यांसारख्या सर्व सेवा बंद राहणार आहेत. ही नियमावली हॉटस्पॉट किंवा सील झालेल्या भागांमध्ये लागू होणार नाही.

महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा आणि इतर महत्त्वाच्या कामांना परवाणगी दिली असली तरी सांस्कृतीक कार्यक्रम आणि रेल्वे व विमान सेवा या 3 मेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे. कोरोनामुक्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये आणि कोरोनाची संख्या कमी असणाऱ्या म्हणजेच ग्रीन आणि ऑरेंज झोनसाठी उद्योगधंद्यांना परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यांतर्गत व्यवहार देवाण-घेवाण आणि प्रवास करता येऊ शकतात. मात्र मात्र जिल्ह्यात ते जिल्ह्या असा प्रवास किंवा कोणतेही व्यवहार सध्या करता येणार नाहीत. 

 रेड झोनम आणि हॉटस्पॉट असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये नियमांच काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे. या ठिकाणी कोणतेही नियम शिथील करण्यात आले नाहीत. ऑरेंज झोनमध्ये कोरोनाचा प्रभाव मध्यम असलेल्या जवळपास 18 जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, गोंदिया हे जिल्हे आहेत. ग्रीन झोनमध्ये धुळे, नंदूरबार, सोलापुर, परभणी, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे आहेत. 

 शेतीची कामं सुरू राहतील शेतकरी संबंधित सर्व उपक्रम तसेच, शेतकऱ्यांना काम करण्याची परवानगी दिली जाणार आहे. कृषी उपकरणांची दुकाने, त्यांची दुरुस्ती व सुटे भागांची दुकाने खुली राहतील. खते, बियाणे, कीटकनाशके तयार करणे व त्यांचे वितरण करण्याचे काम चालूच राहतील, त्यांची दुकाने खुली असतील.हॉटेल , दुकाने , इंटरनेट कॅफे , हे ही बंद राहतील  एका राज्यातून दुसर्‍या राज्यात शेतीसंबंधित साहित्याची देवाणघेवाण केली जाऊ शकते. बँकसेवा सुरू राहणार