मुबईत बाधितांचा आकडा गेला 1549 वर , आणि कोरोनाबळी संख्या 1000 च्या वर 

dharavi corona updates


देशात जीवघेणारा कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव पाहायला मिळत आहे. उद्या देशातील लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 10 वाजता देशाला संबोधित करणार आहेत.




सध्या मुबईत (Mumbai) कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकट्या मुबईत आता पर्यन्त मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 1549पर्यंत पोहोचली असून आतापर्यंत येथे 100 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Youtube Channel Subscribe करा 
मुबईत आशियातील सर्वात मोठी धारावी झोपडपट्टी आहे आणि चिंतेची बाब म्हणजे येथे रुग्णसंख्या असून 42 च्या पुढे गेली आहे , त्याच बरोबर वरळीतही रुग्णांची संख्या वाढत आहे.
आज आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत आज एकूण 150 नवीन रुग्ण दाखल करण्यात आले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. 


मृत्यू झालेल्यांमध्ये 6 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये सर्वात कमी म्हणजे 42 वर्षीय व्यक्ती व सर्वाधिक 82 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय आज मुंबईतून 43 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत एकूण 141 जण बरे होऊन घरी गेले आहेत.