udhav thakerey devendra fadanvis vaad



मुंबई , : पालघरमध्ये दोन साधू आणि चालकाच्या हत्या प्रकरणामुळे देशात राजकारण सुरू झाले आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ह्या घटनेला जातीय रंग देऊ नये असे सांगितले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने 101 आरोपींना अटक केली आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा पूरता बोजवारा उडाला आहे. पालघरमधील घटना ही अतिशय गंभीर आणि अमानवीय आहे. आज देश एका गंभीर परिस्थितीला सामोरा जात असताना तर हा प्रकार आणखी व्यथित करणारा आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोरातील कठोर शिक्षा करावी, ही माझी राज्य सरकारकडे मागणी आहे. असे ट्विट माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी केली आहे .



यावर शिवसेनेने पालटवार करत म्हणले आहे की पालघरमधील ज्या गडचिंचले गावात ही दुर्घटना घडली ते गाव व ग्रामपंचायत गेली दहा वर्षे पूर्णपणे भाजपच्या ताब्यात आहे. सरपंच भाजपचाच आहे. म्हणजे मारहाण करणार्‍यायांचा रंग कोणता, हे सांगायला नको, असं म्हणत शिवसेनेनं थेट भाजपवर हल्लाबोल केला आहे.




हिंदू-मुसलमान असा रंग देण्याचा प्रयत्न

पालघरजवळ झालेल्या दोन साधूंच्या हत्येने महाराष्ट्राच्या परंपरेस हादरा बसला हे खरे. असा हादरा बसावा म्हणून कोणी हे सर्व घडवले नाही ना? महाराष्ट्रात साधूंची भगवी वस्त्र रक्ताने भिजली याचे राजकारण कोणी करू नये, हा सर्व प्रकार म्हणजे महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रकार आहे हे आता उघड होऊ लागले आहे. कारण काही मंडळींनी यासही हिंदू-मुसलमान असा रंग देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, साधूंवर हल्ला करणारे जितके नराधम आहेत तितकेच नराधम या प्रकरणास जातीय आणि धार्मिक रंग देणारे आहेत, अशी टीकाही सेनेनं केली.