corona coid 196


मुंबई, 31 मार्च : महाराष्ट्रात एका दिवसात 72 कोरोनाव्हायरसचे नवे रुग्ण दाखल झाले आहेत. ही एका दिवसातली आतापर्यंतची सर्वांत मोठी संख्या आहे. देशभरात कुठल्याही एका राज्यात एकदम एवढ्या संख्येने रुग्णांमध्ये वाढ झालेली नाही. आता राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 302 झाला आहे.

संपूर्ण राज्य लॉकडाउन असतानाही एकदम 72 ने रुग्णसंख्या वाढली. 230 वरून आकडा थेट 302 झाला आहे.


72 more persons have tested positive for #COVID19 in Maharashtra, taking the total number of cases in the state to 302. 59 from Mumbai, 3 from Nagar, 2 each from Pune, Thane, Kalyan-Dombivli, Navi Mumbai and Vashi Virar: State Health Department



एकट्या मुंबई आणि परिसरात (MMR)67 रुग्ण वाढले आहेत. ही एका दिवसातली आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. यातले खुद्द मुंबईतले 59 रुग्ण आहेत. तर पुणे, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, वाशी, विरार इथे प्रत्येकी 2 रुग्ण वाढले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्याचा एकूण आकडा 72 ने वाढला आहे.

मुंबई मध्ये पहिल्यांदाच येवढे रुग्ण वाढले आहे , म्हणून सर्वांनी काळजी घेणे हे खूप गरजेचे झाले आहे.  कोरोंनामुले सोमवारी दोन जणांचा मृत्यु झाला आहे. व राज्यातील 39 रुग्णाची तब्येत बरी झाली आहे.