कोरोनाचा उद्रेक! निजामुद्दीनमध्ये एकाच ठिकाणी 200-300 लोकं कोरोना संशयित, 6 जणांचा मृत्यूभारतातील Coronavirus बाबत नवी माहिती समोर, तज्ज्ञ म्हणाले...

निजामुद्दीनमध्ये एकाच ठिकाणी 200-300 लोकं कोरोना संशयित, 6 जणांचा मृत्यू
देशभरातून तब्बल 1500 लोकांनी 13 ते 15 मार्च दरम्यान दिल्लीच्या निजामुद्दीनमधील तब्लिगी मारकझला भेट दिली. दरम्यान, येथे जमलेल्या बर्‍याच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. 



दिल्ली सरकारच्या वतीने मौलाना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथे जमलेल्यांपैकी आतापर्यंत 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, 200हून अधिक लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तब्लिगी मरकझ येथे उत्तर प्रदेशातील तब्बल 157 लोकं सामिल झाली होती. यानंतर उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने सर्व जिल्ह्यांमधील माहिती मागणारे एक पत्र जारी केले आहे.



 तर, मृत्यू झालेल्यांपैकी सहा जण तेलंगणातील आहेत. दिल्ली पोलिसांच्या वतीने या संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहेत. 200 लोकांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर तब्बल 2000 लोकांना होम क्वारंटाईन केले आहे. 

 याआधी अंदमानवरून तब्बल 9 धर्मोपदेशकांनाही तबलीघी मारकझला भेट दिली होती. यातील एकाचा श्रीनगरमध्ये कोरोनामुळे मृत्यूही झाला होता. मात्र आता तब्बल 15 दिवसांनी संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर प्रशासनाने याकडे लक्ष दिले आहे.