Manse madhe harshwardhan jaadhav

Harshwardhan jadhav manse me, kaand kannad aamdar harshwardhan jaadhav manse me pravesh ,manse me harshwardhan jadhav pravesh


मुंबई : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन यांनी आज मनसेमध्ये प्रवेश केला आहे.
कृष्णकुंजवर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला, या वेळी जाधव यांनी औरंगाबाद चे माजी आमदार व शिवसेनेचे नेते श्री चंद्रकांत खैरे यांच्यावर जोरदार टीका केली.


 व म्हणाले की आता खैरे कधीच खासदार होणार नाही. हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन यांच्यासोबत नांदेड शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश कौटगे आणि माजी शहरप्रमुख सुहास दशरथे यांनीही मनसेमध्ये प्रवेश केला.

हर्षवर्धन म्हणाले की गेल्या काही वर्षांमध्ये मी थोडा भटकलो होतो, व मला काही गैरसमज झाले होते. व आता माझी घरवापसी झाली आहे.

 ठाकरे यांचं हिंदुत्व बेगडी नाही. या हिंदुत्वाचा पुरस्कार झाला पाहिजे. शिवसेना खऱ्या हिंदुत्वपासून दूर जात आहे, त्यामुळे अनेक शिवसैनिक मनसेमध्ये येतील.
 दानवेचा जावई मनसेमध्ये गेला म्हणजे आता मनसे आणि भाजप एकत्र येईल, असं कुणी समजू नये, असंही हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले

माजी खासदार चंद्रकांत खैरे आयुष्यात कधीच खासदार होणार नाही, हे मी लिहून देतो,मी त्यांना आधी सुद्धा बोललो, आता तुमच वय झाल आहे तुम्ही निवृत्ती घ्यावी , शिवसेनेचे नेतेपद मिळेल त्यावर खुश राहावे. आणि माझ्यावर व माझ्या कुटुंबावर घाणेरडी वक्तव्य बोलणे सोडावे , त्यात पातळी दिसते


हर्षवर्धन म्हणाले मला राज ठाकरे सोबत काम करावे अशी इच्छा होती , पण मध्ये 10 वर्षांचा गॅप गेला, त्यांना पुन्हा पाठिंबा देण्यासाठी मी राज ठाकरे सोबत आलो आहे. मी दीर्घ काळात पासून दूर होतो याची मला खंत आहे.